Archives

Happy Gudi padwa

Posted by at

Happy gudi padwa. First day of the Chaitra month to mark the beginning of the New year according to the lunisolar Hindu calendar.

आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे.

दुसर्‍या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी. भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे.

अलिकडे हिंदुंच्या सणां बद्द्ल खोटा, विषारी, जातियवादि प्रचार केला जात आहे. त्याला बळिन पडता आपल्या पुरातन हिंदु संस्कृती बद्द्ल अभिमान बाळ्गा. मान्य आहे कि आमच्या हिंदु समजात काहि चुकिच्या रुढि-परंपरा असतिल म्हनुन काहि आमचि पुरातन हिंदु संस्कृती आम्हला लाज वाटावी इतकी वाइट मुळिच नाहि. या उलट आम्हला आभिमान वाटावा अशिच आमचि पुरातन हिंदु संस्कृती आहे.

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog