डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’

Posted by at

डॉ. कलाम यांचे लेखन प्रेरणादायी होते. शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने डॉ. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस‘ म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित केला याचा अत्यंत आनंद होत आहे.

आजकालची पिढी वाचतच नाही, त्यांना वाचनात रसच नसतो, वाचनाचं महत्त्वच त्यांना कळत नाही. शाळेत ‘वाचाल तर वाचाल’ असं ओरडून ओरडून सांगितलं होतं, पण या उक्तीचा अर्थचं कळला नसावा बहुधा. हे जर असंच वागत राहिले तर आपली वाचन संस्कृती टिकणार कशी? असा खेद ब-याच वेळा अनेक पुस्तकप्रेमींकडून वर्तवला जातो. पूर्वी वाचनाची भूक प्रचंड असायची इतकी की एखाद्या विषयाची माहिती मिळवायची असली तर ग्रंथालयात पायपीट करा, पुस्तक चाळा असे पुस्तकप्रेमींचे बरेच उद्योग चालायचे पण हल्ली ते होताना दिसत नाहीत किंवा असे प्रकार खूपच कमी झालेत असं काही जणांना वाटतं, म्हणून की काय आपल्याकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी भीती अनेकांच्या मनात दाटून येते.

Kindleसुधारित तांत्रिक युगाचा परिणाम दिसू लागला आहे. पूर्वी जात्यावरच्या ओवीने सकाळ झालेली कळत होती. आता सर्वसामान्यांची सकाळ मोबाईलच्या गजराने होत असताना पाहावयास मिळते. तांत्रिक युगाचा बदल सर्वत्रच दिसतो आहे. तसातो वाचन संस्कृतीत ही आला. व्हाटसअ‍ॅप वरिल शॉर्ट मेसेजेस आणि सोशल मिडिया वरिल कॉमेंट्स च्या पुढे वाचन जात नाही ही मोठी शोकांतीका आहे. तासंतास मोबाईल वर डोळे गाडुन घेनारी पिढी वर्तमांपत्र, पुस्तकांपासुन दुर गेली याचे दुख:आहे. तसेच ते इ-बुक, किंडल सारख्या नव्या तत्रिक, डिजिट्ल वाचनाच्या माध्यमांकडे ही नाही वळले.

Share
  • Google Ads

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog