निर्लज्ज आणि संवेदना हिन

Posted by at

एखादा अपघात घडल्यास त्या ठिकाणचा फोटो काढायचा अथवा त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढायचा आणि मोबाइल अॅप वरुन मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा हा ट्रेंड वाढत चालला आहे. हा उद्योग करणारी मंडळी अप्रत्यक्षपणे पीडिताचा जीव धोक्यात घालत असतात. अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्याएवजी फोटो काढ्नारे हे एक प्रकारे सामाजिक गुन्हा करत असतात.

फोटो किंवा सेल्फी पेक्षा संबंधितांनी स्वतः पीडीत व्यक्तीला मदत केली किंवा मदतीसाठी सक्षम यंत्रणेकडे संपर्क साधून योग्य ती माहिती दिली तर जीव वाचतील, नुकसान टळेल अथवा कमी होईल. मोबाइल सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी वाढत चालला आहे. सामाजिक जबाबदारीचे भान कमी होत आहे. ही बाब घातक आहे.

बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या… मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना… तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले… वर कहर म्हणजे वारंवार विनवण्या केल्यानंतरही ‘कशाला पोलिसांच्या झमेल्यात पडता?’ असे सल्ले… शनिवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी वांद्रयाहून कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसने संध्या आणि टीना या दोन मुलींना जोरदार धडक दिली, त्या जागीच कोसळल्या. संध्या भांडुपची तर टीना चेंबूरला राहणारी. बघ्यांची गर्दी उसळली. त्याच वेळी अमृता जोशी- आमडेकर टॅक्सीने घरी परतत होत्या. काही मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल आहे, तिथे त्यांना नेऊ या, या विचाराने अमृता यांनी दोघींना टॅक्सीतून स्वतः हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी दाखवली, पण मुलींना उचलून टॅक्सीत ठेवण्यास कुणीही पुढे आले नाही. रक्ताच्या थारोळ्यातील दोघींचे फोटो काढून ते अपलोड करण्यात अनेकजण मग्न होते.

सेल्फीचे आजकाल व्यसनच जडले आहे. मात्र अशाच काही सेल्फी चाहत्यावर महानायक अमिताभ बच्चन चांगलेच भडकले. दिल्लीमध्ये एका जवळच्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी अमिताभ उपस्थित राहिले असताना त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याची मागणी करणाऱ्या चाहत्यांना अमिताभ यांनी चांगलेच फैलावर घेतले. एवढंच नाही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना लोकांमधील संवेदना संपत चालल्याचे खडे बोलही अमिताभ यांनी सेल्फीवेड्यांना सुनावलेत.

‘माझ्या जवळच्या मित्राचे अचानक निधन झाले. काल-परवापर्यंत आम्ही बोलत होतो आणि अचानक तो हे जग सोडून गेला. जीवन किती नाजूक आहे ते या घटनेने कळले. अर्थात दिल्लीला मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो. तिथे अंत्यविधी सुरु असतानाच लोक मोबाईलवरून फोटो आणि सेल्फी क्लिक करत होते. हे खूपच धक्कादायक होते. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या काहीच संवेदना दिसत नव्हत्या. श्रद्धांजली देण्यासाठी आलेल्या आप्तांना शोकही त्यांना दिसू नये, हे दुर्दैवी आहे’, असे संतापच अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे

Share
  • Google Ads

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog