Monthly Archives: July 2015

Programming language trend at codefest Hackathon

Posted by at

A hackathon (also known as a hack day, hackfest or codefest) is an event in which computer programmers and others involved in software development and hardware development, including graphic designers, interface designers and project managers, collaborate intensively on software projects.

It’s interesting, then, to see what language programmers turn to when they’ve got their pick of the litter — when they’re coding not with some bosses’ wishes in mind, but when they’re just cracking away for a project at Codefest Hackathon.

At Hackathons

Codefest at Hackathons


The Top 10 Languages At Devpost’s Hackathons:

  1. HTML/CSS (see note below)
  2. JavaScript
  3. Python
  4. Java
  5. C/C++
  6. PHP
  7. Objective-C
  8. C#
  9. Swift
  10. JSON (which isn’t … really a programming language, but is on their list for some reason, so I’m including #11 too)

HTML/CSS and Javascript topping the list seems pretty predictable (cue “scripting language” vs “programming language” debate) — they’re forgiving, don’t require a compiler, run in the browser rather than a specific OS, and tend to be the first languages new coders learn. If you’re walking into a room of strangers looking for a team (as is often the case at hackathons), those languages will be pretty universal.

Note: HTML isn’t quite a “programming” language — it’s a markup language, meaning it’s a means of laying out the elements of a document. But it’s a “language” none the less, and one that pretty much every web developer taps endlessly, so we’ll let the semantic stuff slide.

It’s surprising to see Swift up there already, though — Apple only introduced it 13 months ago.

डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’

Posted by at

डॉ. कलाम यांचे लेखन प्रेरणादायी होते. शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने डॉ. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस‘ म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित केला याचा अत्यंत आनंद होत आहे. (more…)

उच्च विद्यापीठांच्या टॉप१०० रँकिंग मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही.

Posted by at

उच्च विद्यापीठांच्या जागतिक प्रतिष्ठीत रँकिंग मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही ही खरोखरच चिंतेची बाब आहे. भारताला महान बौद्धिक इतिहास आणि वेगाने वाढ्णारी आर्थिक शक्ती असुन जागतिक स्तरावर जगातील सर्वात प्रतिष्ठित उच्च विद्यापीठांच्या रँकिंग मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही.

अमेरीकेचे हार्वर्ड, स्टॅनफर्ड, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ब्रिटनचे ऑक्सफर्ड, केंब्रिज सारखी विद्यापीठ सातत्याने उच्च विद्यापीठांच्या रँकिंग मध्ये अव्वल रहात आली आहेत.

भारतीय विद्यापीठांमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ओफ सायन्स बंगलोर’, आयआयटी-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी-कानपूर, आयआयटी-मद्रास सारखी विद्यापीठ उच्च रँकिंगची आहेत.

Worldwide, the only six institutes in India ranked in the top 300 of the QS World University Rankings of 2015 are IISc Bangalore (at 147) and 5 IITs, IIT Delhi at 179, IIT Bombay at 202, IIT Madras at 254, IIT Kanpur at 271 and IIT Kharagpur at 286. The only Institute that was listed in the top 400 by Times Higher Education rankings was IIT Bombay in the 351-400 category. The Times Asia Rankings featured IIT Roorkee, IIT Bombay, IIT Delhi, IIT Kharagpur, and IIT Madras at 55th, 57th, 65th, 69th and 78th respectively.

निर्लज्ज आणि संवेदना हिन

Posted by at

एखादा अपघात घडल्यास त्या ठिकाणचा फोटो काढायचा अथवा त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढायचा आणि मोबाइल अॅप वरुन मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा हा ट्रेंड वाढत चालला आहे. हा उद्योग करणारी मंडळी अप्रत्यक्षपणे पीडिताचा जीव धोक्यात घालत असतात. अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्याएवजी फोटो काढ्नारे हे एक प्रकारे सामाजिक गुन्हा करत असतात.

फोटो किंवा सेल्फी पेक्षा संबंधितांनी स्वतः पीडीत व्यक्तीला मदत केली किंवा मदतीसाठी सक्षम यंत्रणेकडे संपर्क साधून योग्य ती माहिती दिली तर जीव वाचतील, नुकसान टळेल अथवा कमी होईल. मोबाइल सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी वाढत चालला आहे. सामाजिक जबाबदारीचे भान कमी होत आहे. ही बाब घातक आहे.

बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या… मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना… तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले… वर कहर म्हणजे वारंवार विनवण्या केल्यानंतरही ‘कशाला पोलिसांच्या झमेल्यात पडता?’ असे सल्ले… शनिवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी वांद्रयाहून कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसने संध्या आणि टीना या दोन मुलींना जोरदार धडक दिली, त्या जागीच कोसळल्या. संध्या भांडुपची तर टीना चेंबूरला राहणारी. बघ्यांची गर्दी उसळली. त्याच वेळी अमृता जोशी- आमडेकर टॅक्सीने घरी परतत होत्या. काही मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल आहे, तिथे त्यांना नेऊ या, या विचाराने अमृता यांनी दोघींना टॅक्सीतून स्वतः हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी दाखवली, पण मुलींना उचलून टॅक्सीत ठेवण्यास कुणीही पुढे आले नाही. रक्ताच्या थारोळ्यातील दोघींचे फोटो काढून ते अपलोड करण्यात अनेकजण मग्न होते.

सेल्फीचे आजकाल व्यसनच जडले आहे. मात्र अशाच काही सेल्फी चाहत्यावर महानायक अमिताभ बच्चन चांगलेच भडकले. दिल्लीमध्ये एका जवळच्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी अमिताभ उपस्थित राहिले असताना त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याची मागणी करणाऱ्या चाहत्यांना अमिताभ यांनी चांगलेच फैलावर घेतले. एवढंच नाही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना लोकांमधील संवेदना संपत चालल्याचे खडे बोलही अमिताभ यांनी सेल्फीवेड्यांना सुनावलेत.

‘माझ्या जवळच्या मित्राचे अचानक निधन झाले. काल-परवापर्यंत आम्ही बोलत होतो आणि अचानक तो हे जग सोडून गेला. जीवन किती नाजूक आहे ते या घटनेने कळले. अर्थात दिल्लीला मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो. तिथे अंत्यविधी सुरु असतानाच लोक मोबाईलवरून फोटो आणि सेल्फी क्लिक करत होते. हे खूपच धक्कादायक होते. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या काहीच संवेदना दिसत नव्हत्या. श्रद्धांजली देण्यासाठी आलेल्या आप्तांना शोकही त्यांना दिसू नये, हे दुर्दैवी आहे’, असे संतापच अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog