अक्षय्य तृतीया Akashya Trutiya

Posted by at

ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे. या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात. नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.

Share
  • Google Ads

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog